"The Kashmir Files" प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर - काश्मिर खोऱ्यातील काश्मिरी पंडितावरील अत्याचाराचे, नरसंहाराचे वास्तविक जिवंत चित्रण करणारा ’’दि कश्मिर फाईल्स’’ The Kashmir Files हा चित्रपट असल्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयांनी हा चित्रापट बघावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हा चित्रपट प्रत्यक्ष बधितल्यानंतर केले आहे.
हंसराज अहीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चंद्रपूरातील मिराज थिएटर chandrapur miraj cinema मध्ये जावून दि 18 मार्च रोजी हा चित्रपट बघितला . या चित्रपटावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना त्यांनी म्हटले की, जे काश्मिरी पंडित kashmiri pandit मुळ निवासी होते व ज्यांच्यामुळे काश्मिरची ओळख होती अशा लोकांना धर्मांध, कट्टरपंथी व राष्ट्रविरोधी मुस्लीम संघटनांनी हाकलून लावले. महिला, लहान मुले यांचा बळी घेतला, अमानुष अत्याचार केले तो काळाकुट्ट इतिहास निर्देशक, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यमान पिढीसमोर साकारलेला असल्याने प्रत्येक राष्ट्राभिमानी लोकांनी हा चित्रपट बघावा व या क्रूर घटनेचा खरा इतिहास जाणून घ्यावा अशी भावना अहीर यांनी व्यक्त केली.
या चित्रपटाला बघण्याकरीता शहरी लोकांबरोबरच ग्रामिण भागातील विविध क्षेत्रातील प्रेक्षकांची होणारी गर्दी हे या चित्रपटाचे मोठे यश आहे. दि 19 मार्च रोजी कोरपना तालुक्यातील बहुसंख्य महिला, पुरुष, व्यापारी, युवक, ज्येष्ठ नागरीकांनी हा चित्रपट बघण्याकरीता हजेरी लावली असता हंसराज अहीर यांनी गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी निर्मात्याबरोबरच या चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1990 मध्ये एवढा मोठा अत्याचार होतो परंतु यावर खुलेपणाने भाष्य होत नव्हते ते धाडस या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविल्या गेल.
प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी जीं pm narendra modi सारख्या खंबीर नेतृत्वामुळे 370, 35 A कलम हटविल्या गेले असल्याने असला क्रुर प्रकार यापुढे कोणी करण्याची हिम्मत करणार नाही हे केंद्र सरकारचे central government फार मोठे यश आहे असेही अहीर यांनी म्हटले आहे.
The Kashmir Files "A film that every Indian should watch - Former Union Home Minister Hansraj Ahir.
खबर और अपडेट के लिए loktantrakiawaaz.co.in पर क्लिक करे.