यावर्षीच्या शोभायात्रेमध्ये हे आहे विशेष आकर्षण
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 09 अप्रैल : चंद्रपुरातील ऐतिहासिक काळाराम मंदिर येथून दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
1981 पासून चंद्रपूर येथील ऐतिहासिक काळाराम मंदिर येथून श्रीराम नवमी शोभायात्रेचे आयोजन होत आहे.
➡️ सर्वप्रथम श्री काळाराम मंदिर येथून शोभायात्रेची सुरुवात व यात वेळो वेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जुळत गेले
सर्वप्रथम श्री काळाराम मंदिर येथून शोभायात्रेची सुरुवात काळाराम मंदिराचे विश्वस्त स्वर्गीय प्रभाकर दोमलवार गुरुजी व त्यांच्यासह रमेशचन्द्रजी बागला, स्व.रामजी हस्तक, डॉक्टर बबनराव अंदनकर, इंदापवारजी, श्रीगडीवरजी, त्यावेळेस असणारे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष रघुनाथरावजी देव यांच्या माध्यमातून करण्यात आले, आणि ते आजतागायत सुरू आहे. यात वेळो वेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जुळत गेले. विशेष करून डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार, वसंतरावजी थोटे, राजेंद्रजी गांधी, दिवाकर थोटे, बलरामजी डोडाणी गणपत सत्रे, विवेक आंबेकर, शशिकांत देवगडे, पंकज अग्रवाल यात सहभागी होते.
चंद्रपुरातील श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या माध्यमातून पूजनीय संत मनीषजी महाराज, अध्यक्ष डॉक्टर महावीर सोईतकर, कार्याध्यक्ष रोडमलजी गहलोत सचिव विनोद उपाध्याय, कोषाध्यक्ष घनश्यामजी दरबार, सहसचिव विजय यंगलवार, विवेक आंबेकर, वसंतरावजी थोटे, दामोदरजी मंत्री, गौरी शंकर मंत्री, हरी भैय्या अहिर, राम गोपाल तोष्णीवाल, सुधीर बजाज, ब्रिजभूषण मंत्री, परमारजी, रामकिशन सारडा, रघुवीर अहिर, सुभाष कासमगुट्टीवार, डॉक्टर मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, योगेश भंडारी, शैलेश बागला, रवींद्र नथवाणी, शर्माजी, चिंतावारजी, सुनील महाकाले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुरातील रामनवमी शोभायात्रा विविध समाज, मठ, मंदिर यांना सोबत घेऊन व राजकीय पक्षांचा ही सहभाग घेऊन भव्य स्वरूपात निघत आहे.
➡️ रामनवमीनिमित्त अग्रपूजेचा मान देण्याचे परंपरा सुरू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी 2005 च्या वर्षापासून रामनवमीच्या शोभायात्रेत हिंदू धर्मीय समाज बांधवांना आमंत्रित करून त्यांना रामनवमीनिमित्त अग्रपूजेचा मान देण्याचे परंपरा सुरू झाली. ती प्रथम सुदर्शन समाजाच्या मध्यापासून सुरू होऊन त्यात दरवर्षी विविध समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव येऊन सहभाग नोंदवू लागले. आत्तापर्यंत सुदर्शन समाज, मातंग समाज, मादगी समाज, चर्मकार समाज, गवळी समाज, गोंड समाज, सुतार समाज, कैकाडी समाज, तेलगू शिंपी समाज, जैन समाज, धोबी समाज, धनगर समाज, या समाज बांधवांना श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे राम नवमी निमित्त प्रथम पूजेचा मान- सन्मान देण्यात आला.
➡️ याहीवर्षी ही परंपरा कायम ठेवून
याहीवर्षी ही परंपरा कायम ठेवून कुंभार समाजाला प्रथम पूजेचा मान देण्यात येऊन त्यांचे विभागीय अध्यक्ष अजय मार्कंडेवार हे सपत्नीक आपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह श्रीराम शोभायात्रा प्रसंगी श्रीरामाचे पूजन करणार आहे.
चंद्रपुरातील श्रीराम शोभायात्रा ही फक्त धार्मिक परंपरेशी बांधून नसून ती सामाजिक बंधुभाव समाजात रुजवण्याचा प्रयत्न समाजात करीत आहे.
➡️ यावर्षीच्या शोभायात्रेमध्ये विशेष आकर्षण
प्यार फाउंडेशन तर्फे गोमाता रथ, जगदंब बँड पथकातर्फे 150 बँड पथकांचा संच राहणार असून, त्यासोबतच महाकाली देवस्थानतर्फे भव्य झाकी, सिंधी समाजातर्फे युवकांचा सहभाग व झाकी, तेली समाज तर्फे आकर्षक झाकी व चंद्रपूर शहरातील नगरसेवकांन तर्फे वार्डा वॉर्डातून रामनवमी पूजन व शोभायात्रेत सहभाग.
दीपक बेले चंद्रपुरचा राजा गणेश मंडळ तर्फे जटपुरा गेट येथे सजावट.
जैन समाज तर्फे बून्दी प्रसाद, शरबत आणि थंड पिण्याचे पाणी व सहभाग, सिख समाजातर्फे प्रसाद वितरण व सहभाग.
▶️ चंद्रपुरातील श्रीराम शोभायात्रा ही एक महाराष्ट्रातील नागपूरच्या शोभा यात्रेनंतर विदर्भातील भव्य शोभायात्रा म्हणून ओळखली जाते.
यावर्षी सुद्धा पूजनीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजातील समाज मंडळे, गणेश मंडळे, मार्गातील व्यापारी प्रतिष्ठाने, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, श्रीराम नवमी शोभायात्रेचे पूजन करून प्रसाद वितरणाचे कार्य फार मोठ्या प्रमाणात करनार आहे.
➡️ शोभायात्रेचे पूजन करून प्रसाद वितरणाचे कार्य
यात जैन समाज, सिख समाज, पतंजली परीवार, गायत्री परिवार, आयप्पा मंदिर व अन्य हिंदू पंथ संप्रदायातील संघटन सहभागी होत आहे.
यावर्षी निघणारी शोभायात्रा ही भव्य स्वरूपात निघत असून चंद्रपूर नगरी श्रीराम नवमी निमित्त राममय झाली आहे. चंद्रपूर शहरात मुख्य रस्त्यावर राम भक्तांचे स्वागत साठी स्वागत द्वार व मोठ-मोठे होल्डिंग लावण्यात आले असून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
➡️ शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान
सर्व चंद्रपूर वासियांना श्रीराम शोभायात्रा समितीच्या माध्यमातून भागवताचार्य संत श्री मनीषजी महाराज,
अध्यक्ष डॉक्टर महावीर सोईतकर, कार्याध्यक्ष रोडमलजी गहलोत, सचिव विनोद उपाध्याय, कोषाध्यक्ष घनश्यामजी दरबार, उपाध्यक्ष किसन लालजी चड्डा ,डॉक्टर कुबेर कोतपल्लीवार, अशोक जिवतोडे, सुरेंद्रजी दवे, सुनील पुरांनकर, सौ भारती दुधानी, मंजुश्री कासंगुट्टूवार, शमाताई महाकाले, तथा राजेश जैन, जयंत मामिडवार, विवेक आंबेकर, गणपत सत्रे, विजय यंगलवार, दिनेश बजाज, रामकिशोर सारडा, वर्षाताई महात्मे तर्फे
आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या परिवारासह श्रीराम शोभायात्रेत सहभागी व्हावे व प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद घ्यावा.
Organizing a grand procession on the occasion of Shri Ram Navami since 1981 from the historic Kalaram Temple in Chandrapur.
This is a special attraction in this year's parade.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.