राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दुपारी बैठक, काय निर्णय होणार ? The political atmosphere in the state is heating up due to the loudspeaker, the meeting of the Chief Minister and Home Minister of Maharashtra in the afternoon, what will be the decision?

राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलंय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दुपारी बैठक, 

काय निर्णय होणार ?

#Loktantrakiawaaz
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अल्टिमेटमची गंभीर दखल महाविकास आघाडी सरकारकडून (MVA) घेतली गेली आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण भोंग्याच्या अनुशंगानं महत्त्वपूर्ण घडामोडी राज्यात घडू लागल्या आहेत. पोलीस प्रशासनही सतर्क झालंय. तर इकडे गृहमंत्री उद्धव ठाकरे (Dilip Valse Patil & Uddhav Thackeray Meeting) यांची भेट घेणार आहे. गृहमंत्री दिलीस वळसे पाटील यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होईल. या चर्चेत नेमकं काय ठरतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलंय. अशातच सर्व जिल्हा प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची (Maharashtra Police Officers) पोलिस महासंचालक लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहील, असं निर्णय गृहखात्यानं घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.
भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.

 The political atmosphere in the state is heating up due to the loudspeaker.

 the meeting of the Chief Minister and Home Minister of Maharashtra in the afternoon.

what will be the decision?

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.