305 वधू - वरांचा सामूहिक विवाह सोहळा, माजी खासदार नरेश पुगलिया यांचा उपक्रम, चंद्रपुरात विदर्भस्तरीय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा सम्पन्न, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य, छप्पन भोग (विविध प्रकारचे मिष्ठान्न) भोजन देखील ठेवण्यात आले 305 Bride-Groom Mass Wedding Ceremony, Initiative of Former MP Naresh Puglia, Vidarbha Level Multi-Religious Mass Wedding Ceremony at Chandrapur

305 वधू - वरांचा सामूहिक विवाह सोहळा, 

माजी खासदार नरेश पुगलिया यांचा उपक्रम

चंद्रपुरात विदर्भस्तरीय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा सम्पन्न, 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य

छप्पन भोग (विविध प्रकारचे मिष्ठान्न) भोजन देखील ठेवण्यात आले  

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 20 मे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवेंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट, चंद्रपूर, गौरवबाबु पुगलिया वर - वधू सूचक केंद्र, चंद्रपूर, बी.पी.एम. मजदूर ट्रस्ट, बल्लारपूर व आस्था बहुउद्देशिय चॅरीटेबल ट्रस्ट, वरोरा च्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय सर्वधर्मीय भव्य सामुहिक विवाह मेळावा श्रीबालाजी 'गोल्डन टेम्पल' परिसर येथे शुक्रवारी 20 मे 2022 रोजी सायं. 7 वाजता करण्यात आला. या सोहळ्यात विविध धर्मातील एकूण 305 उपवरवधू गृहस्थाश्रमात प्रवेश केल्याने चंद्रपुर महानगरात हा विषय चर्चेचा ठरला. यावेळी सोहळ्याचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया, विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, खासदार सुरेश धानोरकर, आ.प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव चटप, निर्दोष पुगलिया, श्यामबाबू पुगलिया, नगीन पुगलिया, राहुल पुगलिया यांचेसह पुगलिया परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करीत, नवं दाम्पत्यांना आशीर्वाद दिले.

➡️ विविध आनंददायी कार्यक्रमांचे आयोजन
 आझादी का अमृत महोत्सवच्या पार्श्वभूमीवर यावेळी बुधवार 18 मे रोजी सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, ( मुंबई ) यांच्या विविधांगी सुश्राव्य गायनाच्या बहारदार कार्यक्रमाचे श्रीबालाजी मंदीर देवस्थान परिसरातील तिरुपती बालाजी नगरीचे भव्य प्रांगण, दाताळा रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले. तर गुरुवार 19 मे रोजी याच स्थळी सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत उस्ताद मुनव्वर मासूम व कव्वाल रुबी ताज, मुंबई यांचा कव्वाली गायन नंतर शुक्रवार 20 मे रोजी रात्री 8 वाजेपासून छप्पन भोग (विविध प्रकारचे मिष्ठान्न) भोजन देखील ठेवण्यात आले होते. सन 2000-2001 मध्ये गणेशोत्सव प्रित्यर्थ आयोजित केलेल्या 'छप्पन भोग' स्वरुची आनंददायी भोजनाची आठवण व्हावी म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

➡️ 3 एकरात उभी करण्यात आली व्यवस्था 
 20 मे रोजी सायंकाळी पार पडणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मातील 162, बौद्ध धर्मातील 98, ख्रिश्चन धर्मातील 6 तर मुस्लिम धर्मातील 2 अन्य 37 असे एकूण 305 जोडपे विवाह बद्ध झाले. यासाठी 3 एकर परिसरात भव्य व्यवस्था उभारण्यात आली. न्यु इंग्लिश हायस्कूल येथे उपवधुसाठी तर राजीव गांधी कामगार सभागृह येथे उपवरांसठी व्यवस्था करण्यात आली.

305 Bride-Groom Mass Wedding Ceremony.

Initiative of Former MP Naresh Puglia.

 Vidarbha Level Multi-Religious Mass Wedding Ceremony at Chandrapur.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.