ज्युबिली हायस्कुल येथे मिळणार शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनिंना महिनाभर कुस्तीचे निशुल्क प्रशिक्षण, श्री जगनगुरु व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम Jubilee High School offers free month-long wrestling training to school children Commendable activities of Shri Jaganguru Exercise School

ज्युबिली हायस्कुल येथे मिळणार शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनिंना महिनाभर कुस्तीचे निशुल्क प्रशिक्षण

श्री जगनगुरु व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 04 मे: चंद्रपुर स्थानिक ज्युबिली हायस्कुल येथील मैदानात चंद्रपूर जिल्ह्यातील कुस्ती खेळाची आवड असलेल्या युवकांसाठी महानगरातील श्री जगनगुरु व्यायाम शाळेच्या माध्यमातून उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा उद्घाटन सोहळा दि. १ मे रोजी संपन्न झाला. प्रशिक्षण शिबिराची सुरुवात बजरंगबली चे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 

या उद्घाटन समारंभाला भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक डॉ. रणवीरसिंह राहाट, श्री जगनगुरु व्यायाम शाळेचे अध्यक्ष डॉ. देवानंद गुरु, युवा नेते रघुवीर अहीर,  तालीम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष वासू देशमुख, विठ्ठल व्यायाम शाळा अध्यक्ष धनंजय येरेवार, श्री जगनगुरु व्यायाम शाळेचे प्रशिक्षक तसेच एन आय एस कुस्ती प्रशिक्षक सुहास बनकर, ज्युबिली हायस्कुलचे मोरेश्वर बारसागडे सर, मार्शल आर्ट प्रशिक्षक प्रदीप पुणेकर, प्रवीण पडवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

मैदानी खेळातील कुस्ती हा खेळ युवकांना शारीरिक व मानसीक दृष्ट्या अधिक मजबूत बनवतो. आज कुस्ती या खेळाला विश्वस्तरावर महत्वाचे स्थान असतांना अनेक स्पर्धांचे आयोजन व भारतीय खेळाडूंचा सहभाग हा महत्वाचा असतो. कुस्तीच्या माध्यमातून अनेक युवकांनी आपल्या चिकाटी व मेहनतीने आपल्या देशाला अनेक विश्वस्तरीय आयोजनांत नावलौकिक मिळवून दिले आहे व हे येणाऱ्या कुस्तीगीर भावी पिढीला प्रेरणादायी ठरत आहे असे मनोगत आपल्या उद्घाटनीय संबोधनातून भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक डॉ. रणवीरसिंह राहाट व्यक्त केले. पुढे बोलतांना राहाट यांनी विद्यार्थ्यांना कुस्ती बद्दल व कुस्तीगीर सरावाबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. 

सदर शिबीर निशुल्क असून शिबिराच्या माध्यमातून युवकांना कुस्तीच्या तांत्रिक डावपेचाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सहभागी कुस्तीगिरांना मोफत दूध, अंडे व पोषक कडधाने उपलब्ध करून देण्यात येणार असून शिबीर १ मे ते ३१ मे पर्यंत राहणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी केली. 

 प्रसंगी विदर्भ केसरी कुस्तीस्पर्धे मध्ये सांघिक द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या कुस्तीगीरांचा व एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर शिबिराचा लाभ जिल्ह्यातील कुस्तीगीरांनी घेत भविष्यातील स्पर्धांसाठी आपल्याला विशेष तयार करण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.

या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक धर्मशील काटकर यांनी, आभार प्रदर्शन शाम राजूकर तर सूत्रसंचालन वैभव पारशिवे व माधुरी झाडे यांनी केले.

Jubilee High School offers free month-long wrestling training to school children.

Commendable activities of Shri Jaganguru Exercise School.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.