आज 5 वाजता फेसबुक लाइव
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) थेट जनतेशी बोलणार आहेत. ते पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे ही एखादी मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची जे विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांची सख्या ही अल्पशी उरलेली. सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमत्री उद्धव ठाकरे हे राजीनाम्याची घोषणा करणार का? असाही एक सवाल सध्या राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे.
Chief Minister Uddhav Thackeray will speak directly to the people,
Facebook Live today at 5 p.m.