चंद्रपुर जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका अंतिम प्रभाग रचना नोटीस बोर्डावर प्रसिध्द
चंद्रपूर, दि.28 जून : राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती भौगोलिक सीमा निश्चित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस नागपूर विभागीय आयुक्तांकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर अंतिम प्रभाग रचना व अनुसूची 27 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, तसेच जिल्हा परिषद कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
Chandrapur Zilla Parishad and All Panchayat Samiti General Election Final Ward Formation Notice Board Published.