आज संध्याकाळी शपथविधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तास्थापना करणार हे निश्चित झालं. त्यानंतर आता फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसंच दोघांनी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावाही केलाय. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस आणि शिंदेंना पेढा भरवला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
Eknath Shinde will be the new Chief Minister of Maharashtra - Devendra Fadnavis
The swearing-in ceremony this evening