व्यापारी उद्योजक यांचे समवेत बैठकांचे आयोजन
चंद्रपूर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर या राज्याच्या व्यापार उद्योग व कृषी उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी रविवार दिनांक 24 जुलै रोजी चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी साडे दहा वाजता फेडरेशन ऑफ ट्रेडस कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच चंद्रपूर व्यापारी मंडळ यांच्यातर्फे महेश भवन येथे आयोजित व्यापारी परिषदेस ते उपस्थित राहणार असून
सायंकाळी चार ते सहा या वेळेत विविध औद्योगिक व व्यापारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या समवेत चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासंबंधी ते चर्चा करतील.
शंभर वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेल्या राज्याच्या सर्वात मोठ्या शिखर संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर ललित गांधी प्रथमच चंद्रपूरमध्ये येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याबद्दल जिल्ह्यातील व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये उत्सुकता आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या व्यापार ,उद्योग क्षेत्रासाठी ते काय घोषणा करतात इकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर सध्या देशभर गाजत असलेल्या अन्नधान्य व खाद्यपदार्थावरील पाच टक्के जीएसटी रद्द करून घेण्यासाठी त्यांनी चालवलेल्या आंदोलनाची पुढची दिशा या बैठका मधून जाहीर होईल अशी अपेक्षा ही व्यक्त करण्यात येत आहे.
Newly elected president of Maharashtra Chamber of Commerce Lalit Gandhi on a visit to Chandrapur on Sunday
Organizing meetings with businessmen