स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची दर्शनी जाहिरात एक हजार चौरस सेंटीमीटर द्यावी राज्य शासनाकडे मागणी
माजलगाव : भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाची महाराष्ट्र शासनाची दर्शनी जाहिरात देताना ती एक हजार चौरस सेंटीमीटरची देण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनमान्य जाहिरात यादीवरील वृत्तपत्रांना ज्या जाहिराती दिल्या जातात त्यात स्वातंत्र्य दिनाची एक दर्शनी जाहिरात असते याचबरोबर " हर घर झेंडा" या उपक्रमाची एक जाहिरात जादा देण्यात यावी. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाची दर्शनी जाहिरात 1000 चौरस सेंटीमीटरची देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे. राज्य शासनाने या मागणीचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करून देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वृत्तपत्रांना "हर घर झेंडा" या उपक्रमाची जाहिरात देण्यात यावी तसेच स्वातंत्र्य दिनाची जाहिरात एक हजार चौरस सेंटीमीटर देण्यात यावी. अशी विनंती करण्यात आली आहे.
Request to the state government to give one thousand square centimeter advertisement of 75 years of independence.