🔹नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार
चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरतर्फे मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता ज्युबली हायस्कुल, चंद्रपूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताहानिमीत्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून चंद्रपुर जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने,राज्यांतील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरीस इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होत असून या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून उमेदवारांना नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर औरंगाबाद, पूणे व अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडुन कळविण्यात आले आहे.
मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायाकिंत कमीत-कमी तीन प्रतींसह उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाइन अप्लाय करावे. तसेच या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांविषयी जिल्हा समन्वयक अमरीन पठाण या मार्गदर्शन करणार आहेत. सदर रोजगार मेळाव्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172 252295 कार्यालयीन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
🔹Organization of Pandit Dindayal Upadhyay Employment Fair on 18th October
More than 2 thousand posts will be filled through nominated companies
Chandrapur, Dt. October 11: On the occasion of Amrit Mahotsav of Independence by District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Chandrapur on Tuesday, dt. Pandit Dindayal Upadhyay Employment Fair has been organized on October 18, 2022 at 11 am at Jubilee High School, Chandrapur.
An employment fair is being organized on the occasion of Maharashtra Start Up, Employment and Entrepreneurship Week and in order to provide employment opportunities to the educated unemployed candidates of Chandrapur district in various fields and to contact the well-known entrepreneurs of the states directly with the job-seeking candidates, the said employment fair is being organized. .
Various reputed companies are participating in this employment fair and more than 2000 posts will be filled through various reputed companies. From this meeting, the candidates will get employment opportunity in Nagpur, Chandrapur, Kolhapur Aurangabad, Pune and Amravati districts. Entrepreneurs have informed that there are various posts in these companies.
Candidates should attend the meeting with Aadhaar card, photocopy of educational qualification certificate and at least three copies. To participate in the meeting, register on the website https://rojgar.mahaswayam.gov.in and apply online. Also, district coordinator Amreen Pathan will give guidance on various schemes of Annasaheb Patil Economically Backward Development Corporation. No fee will be charged in the said employment fair. Assistant Commissioner of District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center Bhaiyyaji Yerme has appealed to contact the office telephone number of District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center at 07172 252295 for more information about employment fair.