जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे राष्ट्रोत्कर्ष अभियान, चंद्रपूरात विराट दिव्य धर्म संमेलन Jagatguru Shankaracharya Swami Nishchalanand Saraswati's Rashtratokarsha Mission, Big Divine Dharma Conference at Chandrapur

🚩 जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे राष्ट्रोत्कर्ष अभियान

🚩 चंद्रपूरात विराट दिव्य धर्म संमेलन

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: गोवर्धन मठ जगन्नाथपूरी येथील शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मंगळवार 18 ऑक्टोबरला आगमन होत असून श्री जगन्नाथ धाम शकुंतला फार्म नागपूर रोड चंद्रपुर येथे भव्य विराट दिव्य धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सनातन हिंदूधर्माच्या रक्षणासाठी हे अभियान असून शंकराचार्यान्च्या  स्वागतार्थ विश्वाहिंदू परिषदसह इतर धर्मप्रेमी संस्था सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती पत्रपरिषदेत स्वामी नारायणधामचे भगवताचार्य श्री मनिषभाई महाराज यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी विश्वाहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गेहलोत, दामोदर मंत्री, शैलेंद्र बागला, अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.

🚩 मनिष महाराज म्हणाले, जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती 80 वर्षाचे असून त्यांनी सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 100 मुख्य शहराचा प्रवास केला आहे. मंगळवारी सकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान त्यांचे रेल्वेने आगमन होणार असून वेदमंत्रांचा उच्चाराने त्यांचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी 4 ते सायं 7 वाजता शकुंतला फार्मस येथे त्यांचे विशिष्ट मार्गदर्शन झाल्यावर 850 वर्ष जुन्या शिवलिंगाचे पूजन ते करतील. याचवेळी धर्मप्रेमींना 2500 वर्ष जुन्या पावन नारायण पादुकांचे दर्शन घेता येईल. काशी विश्वनाथ येथे अभिमंत्रित केलेले 5100 रुद्राक्ष महाप्रसाद म्हणून उपस्तितांना प्रदान केले जातील अशी माहिती त्यांनी दिली.

🚩 यात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
विराट दिव्य धर्म संमेलनाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपुर जिल्ह्यातील 14 तालुक्यातून धर्मप्रेमींची मांदियाळी होणार असून यात विश्वाहिंदू परिषद, गायत्री परिवार, बजरंग दल व इतर संघटनांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती विहिपचे रोडमल गेहलोत यांनी दिली.

🚩 संस्कारांच्या सिंचनासाठी अभियान
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी 200 च्यावर ग्रंथ लिहिले. दररोज ते लिखाणकार्य करतात. हिंदुधर्मातील संस्कार आज लोप पावत आहेत. त्या संस्काराचे सिंचन व्हावे म्हणून हे राष्ट्रोत्कर्ष अभियान आहे, पुढील 3.5 वर्षात ते पुन्हा रुजवले जातील अशी माहिती भगवताचार्य मनीष महाराज यांनी दिली.

🚩 Jagatguru Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati's Rashtratokarsh Abhiyan

 🚩 Virat Divya Dharma Samelan in Chandrapur

#Loktantrakiawaaz
 Chandrapur: Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati of Govardhan Math Jagannathpuri is arriving on Tuesday 18th October and a grand Virata Divya Dharma Samela is organized at Sri Jagannath Dham Shakuntala Farm Nagpur Road Chandrapur.  Bhagwatcharya of Swami Narayandham Shri Manishbhai Maharaj informed in the press conference that this campaign is for the protection of Sanatan Hinduism and other religious organizations including Visva Hindu Parishad are ready to welcome Shankaracharya.

 District President of Vishwa Hindu Parishad Rodmal Gehlot, Damodar Mantri, Shailendra Bagla, Ajay Jaiswal were present on this occasion.

 🚩 Manish Maharaj said, Jagatguru Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati is 80 years old and has traveled to 100 major cities for the protection of Sanatan Hinduism.  He will arrive by train between 6 to 7 am on Tuesday and will be welcomed by reciting Vedic mantras.  He will worship the 850-year-old Shivlinga at Shakuntala Farms from 4 pm to 7 pm after his special guidance.  At the same time, devotees can visit the 2500-year-old Pawan Narayan Paduka.  He informed that 5100 Rudrakshas invited to Kashi Vishwanath will be provided as Mahaprasad to those present.

 🚩 Participation of various Hindutva organizations
 Rodmal Gehlot of VHP informed that for the success of Virat Divya Dharma Sammelan, there will be a procession of religious lovers from 14 talukas of Chandrapur district.

 🚩 Campaign for Sanskars
 Shankaracharya Swami Nishchalananda Saraswati wrote over 200 books.  Every day they do writing work.  Hindu rituals are disappearing today.  Bhagwatcharya Manish Maharaj informed that this is a Rashtratokarsh Abhiyan to irrigate that culture, it will be re-rooted in the next 3.5 years.