बल्लारपुर: बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.विनोद बोलीवर सर, प्राचार्य बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल मुख्य अतिथी म्हणून कु. कुमुदिनी भोयर पत्रकार तथा गायिका मूल, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. दुर्गा कोटगले व सौ. वैशाली पिपरे शिक्षिका हे उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई जयंती निमित्त भाषण व गायन प्रस्तुत केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री. विनोद बोलीवर सर यांनी विद्या्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मुख्यअतिथी म्हणून लाभलेल्या कुमुदिनी भोयर यांनी देशभक्तीपर गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू .शिरिशा मेडपल्लिवर व शुभांगी मडावी यांनी केले तर या कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. तोषी जयस्वाल तसेच आभार प्रदर्शन कू.प्रगती खोब्रागडे यांनी केले.