चंद्रपूर : जैन धर्मियांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून विरोध सुरू झाला आहे. हे तिर्थक्षेत्र वाचविण्यासाठी चंद्रपूरातील जैन बांधव एकवटले आहे. शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी जैन भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, झारखंड राज्य सरकारने घोषित केलेला सम्मेद शिखरजी बाबत जैन समाजाच्या मागण्या मान्य केल्या. देशातील जैन समाजाच्या भावनेचा आदर ठेवत तीर्थक्षेत्र म्हणूनच कायम ठेवण्याचा निर्णय आज दि. 5 जानेवारी रोजी घेतलेला आहे. जैन समाजाच्या मागणीचा आदर केल्यामुळे ६ जानेवारी रोजी चंद्रपुरातून काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव यानी सगल्या मागन्या मान्य केल्या, अशी माहिती चंद्रपूरचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी दिली.
Tomorrow's silent march of Chandrapur Sakal Jain brothers for Sammed Shikharji pilgrimage has been postponed