चंद्रपुर येथील मंगल कार्यालय व रामनगर येथील दुकान सील Chandrapur and shop seal at Ramnagar

चंद्रपुर सरकार नगर शिंदे येथील  मंगल कार्यालय व रामनगर येथील दुकान सील

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ५ मार्च -  १,९८३२२ रुपयांची थकबाकी असणाऱ्या सरकार नगर येथील शिंदे मंगल कार्यालयाला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले असुन रामनगर येथील २०१६ पासुन १ लक्ष थकबाकी असणाऱ्या प्रभाकर कोरडे यांचे दुकानही सील करण्यात आले आहे. मालमत्ता कर वसुली हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याने महापालिकेने थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १२ पथके गठीत करण्यात आली असुन वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे.

कर विभागातर्फे अनेक गाळ्यांवर कारवाई प्रस्तावीत आहे. जप्ती पथक जाताच यातील अनेक गाळेधारकांद्वारे कराचा पुर्ण भरणा केला जातो जसे मेट्रो फूटवेअर, बाजार वॉर्ड येथील सौरभ लोढा, विठ्ठल मंदिर येथील बबन येरेवार, शास्त्रीनगर येथील उपगन्लावर बिल्डर्स, एकोरी प्रभागातील बळवंत डगली, सिव्हिल लाईन येथील हासनी, नगिनाबाग येथील भुविज्ञान व खनिकर्म कार्यालय, बालाजी वॉर्ड येथील संध्या भोयर, श्रीनाथ ज्वेलर्स, इंडस्ट्रीयल इस्टेट येथील युनिटेक इंजिनीअरिंग, अमर आर्टस्  या सर्व मालमत्ता धारकांनी कर वसुली व जप्ती पथक पोहोचताच सकारात्मक प्रतिसाद देत कराचा पूर्ण भरणा केला आहे तर व्हिजन टाॅवर कंपनी कंपनीला कर भरण्यास १५ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सदर कारवाई ६ मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील, नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले, अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे, पथक प्रमुख नागेश नित, नरेंद्र पवार, अमित फुलझेले, चिन्मय देशपांडे, अमुल भुते, प्रगती भुरे, अतुल भसारकर, रवींद्र कळंबे, सोनू थुल, प्रतीक्षा जनबंधु, अतुल टिकले, सागर सिडाम, विकास दानव, चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.

Mangal office at Chandrapur Sarkar Nagar Shinde and shop seal at Ramnagar