🦿श्री शांतीनाथ सेवा मंडळा व सकल जैन समाज चंद्रपुर तर्फे दिव्यांगांना मोफत कॅलीपर तथा जयपुर फुट वितरण शिबिर
🩼 चंद्रपुर जैन भवनात 8 दिवस चालणार शिबिर
🦿 चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोलीतील दिव्यांगाना मिळणार मदत
🦽 महावीर विकलांग सेवा समिती जयपुर सहकार्याने शिबिराचे आयोजन
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर 8 मार्च: मागिल कित्येक वर्षांपासून चंद्रपूर येथिल श्री शांतीनाथ सेवा मंडळ, सकल जैन समाज चंद्रपुर जिल्हा तथा महावीर विकलांग सेवा समिती जयपुर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार नरेश बाबु पुगलिया ह्यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांना सामान्य मानवाप्रमाणे स्वतःच्या पायाने चालता यावे, स्वतःची कामे स्वतः करता यावी तसेच त्यांचे परलंबित्व दुर व्हावे ह्या उदात्त हेतूने चंद्रपूर शहरात दिव्यांगांना मोफत कॅलीपर, जयपुर फूट, कुबड्या तसेच तिन चाकी सायकल त्याचप्रमाणे कर्णबधिरांना कर्ण यंत्र मोफत देण्यात येणार असुन ह्यावर्षी हे शिबिर विदर्भ स्तरावर घेण्यात येणार आहे. ह्या शिबिराचा लाभ चंद्रपूर सह यवतमाळ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगिनींना होणार असुन 20 ते 27 मार्च दरम्यान सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे.
नियोजनाप्रमाणे पाहिले तिन दिवस 20, 21 व 22 मार्च चंद्रपूर जिल्हा, 23 व 24 मार्च यवतमाळ तसेच 25 ते 27 मार्च गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आले असुन काही कारणास्तव कुठल्याही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव नियोजित दिवसव्यातिरिक्त इतर दिवशी आल्यास त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार असल्याचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबु पुगलीया ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघांचे अध्यक्ष योगेश भंडारी, शकुंतला बांठिया, सरला बोथरा, अर्चना मुनोत, राजश्री बैद उपस्थित होते.
शिबिरात बद्दल इतर माहिती प्राप्त करण्याकरिता आयोजकांनी संपर्क क्रमांक जाहिर केले असुन काहीही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे 7588660022, 9822247339.
🦿Free Caliper and Jaipur Foot Distribution Camp for Disabled by Shri Shantinath Seva Mandal and Sakal Jain Samaj Chandrapur
🩼 The camp will run for 8 days at Chandrapur Jain Bhavan
🦿 Help will be given to the disabled in Chandrapur, Yavatmal and Gadchiroli
🦽 Organized the camp in collaboration with Mahaveer Ambandik Seva Samiti Jaipur