#Loktantrakiawaaz
चंद्रपूर/ नागपूर / यवतमाळ - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालय द्वारे जारी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून महामहिम राष्ट्रपतींनी दि 02 डिसेंबर, 2022 रोजी त्यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष रोष्टरनुसार भरण्याकरीता सुनावणीद्वारा आढावा घेतांनाच ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक प्रश्नांबाबत अत्यंत जागरुकतेने कार्य करीत आहे. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते प्रभावीपणे कार्यरत आहेत.
हंसराज अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे 4 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टील सह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावर उल्लेखनीय कार्य केले आहे. 16 व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच उर्वरक व रसायन मंत्री या पदांचे निर्वहन सुध्दा त्यांनी प्रभावीपणे केले आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल झाल्याबद्दल हंसराज अहीर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Hansraj Ahir, chairman of the National Commission for Backward Classes, has been given the status of Union Cabinet Minister
#Loktantrakiawaaz
Chandrapur/Nagpur/Yavatmal - The post of National Commission for Backward Classes Chairman Hansraj Ahir has been conferred the equivalent status of a Cabinet Minister through a letter issued by the Union Home Ministry. He was appointed as the Chairman of the National Commission for Backward Classes by His Excellency the President on December 02, 2022. Now this post has been given the status of Union Cabinet Minister.
After assuming the responsibility of the President, Hansraj Ahir has been working with great vigilance regarding the social, educational and employment issues of OBCs while reviewing the OBC officials, employees, workers in the government, semi-government, industries, various companies, coal mining sector in various states of the country to fill the backlog according to the roster. He has been effectively working as the National President for constitutional rights of OBCs.
Hansraj Ahir has previously represented Chandrapur Lok Sabha constituency 4 times. A member of the Maharashtra Legislative Council, during his tenure as an MP, he has done remarkable work as chairman and member of other Parliamentary Standing Committees including Coal and Steel. He has also effectively discharged the posts of Union Minister of State for Home Affairs and Minister of Fertilizers and Chemicals in the 16th Lok Sabha. Hansraj Ahir is being congratulated from all quarters for being conferred the status of Cabinet Minister