चंद्रपुर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून देशातील प्रत्येक नागरिकाला
हक्क, अधिकार दिले. अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले. त्यामुळे आज प्रत्येकजण आपले म्हणणे छातीठोकपणे मांडू शकत आहे. यातून चंद्रपूर येथील लिकर असोसिएशनचे पदाधिकारीसुद्धा सुटलेले नाहीत. त्यामुळेच हे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीला दारूविक्री बंद ठेवण्याच्या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेऊ शकले. परंतु, लिकर असोसिएशनची ही कृती निश्चितच न पटनारी अशी आहे. ज्या महामानवाने आपल्याला सर्व अधिकार दिले, हक्क दिले, त्याच महापुरुषांच्या जयंतीदिनी दारू विक्री केली नसती, तर खूप मोठे नुकसान झाले नसते. परंतु, दारू विक्री करण्याच्या निर्णयावर ठाम राहत लिकरच्या पदाधिका-यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली. न्यायालयाने दिलेली स्थगिती हिसुद्धा बाबासाहेबांच्या कायद्यामुळे झाली, हे विसरता येणार नाही. काष्ठपूजन, रामनवमीला आपली दारू दुकाने बंद ठेवनारी ही मंडळी मात्र बाबासाहेबांच्या जयंतीसाठी दारू विक्रीसाठी आग्रही होती, यातून या पदाधिका-यांची भूमिका वेगळ्या विचारांची असल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाची भूमिका लिकर असोसिएशन किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या सनाच्या विरोधात नाही. परंतु, लिकर असोसिएशनला आज दारू दुकाने बंद ठेवून बाबासाहेबांना अभिवादन करत समाजात वेगळा संदेश देता आला असता, मात्र, ही संधी लिकर असोसिएशनने गमावली...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
Liquor Association's role is wrong...