गौण खनिज पथकाने केली जप्तीची कार्यवाही
चंद्रपूर, दि.09: गौण खनिज पथकाने दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एमएच 34 बीजी 8386 क्रमांकाचा हायवाची महाखनिज प्रणालीवर तपासणी केली असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी चार तासापेक्षा जास्त अवधी घेतला, त्यामुळे सदर प्रणालीवर अवैध दाखविले. म्हणून सदर हायवा जप्त करण्यात आला. सदर वाहन हे नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे.
तसेच काही वेळानंतर एमएच 34 बीझेड 4996 हायवा तपासला असता तो सुद्धा महाखनिज प्रणालीने अवैध दाखविल्यामुळे जप्त करण्यात आला. सदर हायवा आमीर खान या व्यक्तीच्या मालकीचा आहे.
सदर कारवाई करताना फ्लाईंग स्क्वाॅडमध्ये नायब तहसीलदार अविनाश शेंबटवाड, तलाठी सुरज राठोड, पोलीस पाटील जानकीराम झाडे, साईनाथ धुडसे, पोलीस कर्मचारी प्रशांत नैताम, कोतवाल अंबादास गेडाम व वाहन चालक राहुल भोयर कार्यरत होते.
Two illegal sand transporters were seized by the Subordinate Minerals Team after inspection on the Mahakanij system.