चंद्रपुर शहरात पाणी टंचाईची परिस्थीती निर्माण होऊ देऊ नका, अमृत कलश योजना पूर्णतः कार्यन्वित करा - आ. किशोर जोरगेवार , चंद्रपुर मनपा अधिका-यांसोबत बैठक, अमृत योजने अंतर्गत नळ जोडळी झालेल्या भागात पाणी पूरवठा सुरु करण्याच्या सूचना Don't let the situation of water scarcity in Chandrapur city, fully implement the Amrit Kalash scheme - Aa. Meeting with mla Kishore Jorgewar, Chandrapur municipal officials, instructions to start water supply in areas where taps have been connected under Amrit Yojana

चंद्रपुर शहरात पाणी टंचाईची परिस्थीती निर्माण होऊ देऊ नका, अमृत कलश योजना पूर्णतः  कार्यन्वित करा - आ. किशोर जोरगेवार

 चंद्रपुर मनपा अधिका-यांसोबत बैठक, अमृत योजने अंतर्गत नळ जोडळी झालेल्या भागात पाणी पूरवठा सुरु करण्याच्या सूचना
 
#Loktantrakiawaaz
  चंद्रपुर, 13 मे: मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात पाणी टंचाई भासत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सदर ठिकाणी टॅंकरच्या माध्यमातून पाणी पूरवठा केल्या जात असला तरी हे पूरेसे नाही. त्यामूळे शहरात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याकरीता युध्द स्तरावर काम करत अमृत कलश योजना पूर्णतः कार्यन्वित करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिल्या आहे.
  शहरातील विविध समस्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरिकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी गर्गेलवार, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर संघटक विश्वजीत शाहा,  युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, करणसिंह बैस, आनंद रणशूर, किशोर बोलमवार, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर संघटिका कौसर खान, आदींची उपस्थिती होती.

    सदर बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शहरातील बाबुपेठ, इंदिरा नगर, बंगाली कँम्प, अष्टभुजा वार्ड या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. येथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर योग्य नियोजन करुन सदर भागात नियमित पाणी पूरवठा करण्यात यावा, अनेक भागात अमृत कलश योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या भागात सदर योजने अंतर्गत नियमित पाणी पूरवठा करण्यात यावा, सदर योजने अंतर्गत ज्या भागात पाणी पूरवठा करणे शक्य आहे. त्या भागातील नळ जोडणी तात्काळ करण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिल्या आहे.

   अमृत कलश योजने अंतर्गत 16 झोन तयार करण्यात आली आहेत. यातील 4 झोन मधील कामे प्रलंबीत असून अमृत 2 या योजने अंतर्गत सदर कामे लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त यांनी दिली आहे. यावर सदर उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. अनेक भागात अमृत कलशच्या नळाला पाण्याचा फोर्स नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी  मनपा अधिका-यांच्या लक्षात आणून दिले. यावर विशेष पथक तयार करुन तक्रारी असलेल्या भागाची पाहणी करण्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे.

    सध्या शहरात महानगर पालिकेच्या 16 पाण्याच्या टाक्या कार्यरत आहे. यातील केवळ दोन टाकी येथेच सार्वजनिक नळ आहे. त्यामुळे याची संख्या वाढवून उर्वरित 14 पाणी टाक्यांवर सार्वजनिक नळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे. सदर बैठकीला मनपाच्या संबधित अधिका-यांनी उपस्थिती होती.

Don't let the situation of water scarcity in Chandrapur city, fully implement the Amrit Kalash scheme - Aa.  Meeting with mla Kishore Jorgewar, 

Chandrapur municipal officials, instructions to start water supply in areas where taps have been connected under Amrit Yojana