Ø मुलाच्या हालचालीमुळे बॅनरवरील फोटो प्रकाशित झाल्याचा खुलासा
चंद्रपूर, दि. 23 जून : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे चिमुर तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापी मुलगा जीगल सावसाकडे याचे आधारकार्ड तालुका प्रशासनाने अपडेट केले असून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या फोटोऐवजी आता मुलाचा फोटो अपलोड करण्यात आला आहे.
चुकीचा फोटो अपलोड झाल्याचे कळताच शंकरपूर येथील तलाठ्याला वनमाला सावसाकडे यांच्या घरी पाठविण्यात आले. मुलाला व त्याच्या आईला संबंधित तलाठ्याने आधार सेंटर वर घेऊन जात जीगलचे आधारकार्ड तात्काळ अपडेट करून दिले व संबंधितांना त्यांच्या घरीसुद्धा पोहचविले. यात प्रशासनाकडून कोणतीही दिरंगाई झाली नसल्याचे तसेच सदर आधार अपडेटच्या पावतीवर जीगलचे सावसाकडे याचाचा फोटो असल्याचे तालुका प्रशासनाने म्हटले आहे.
तसेच आधारकार्ड काढतांना किंवा अपडेट करतांना काही चूक झाली असल्यास तात्काळ आधार सेंटरवर कळविण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
The boy's Aadhaar card was updated by the administration, revealing that the photo on the banner was published due to the child's movement