स्वातंत्र्य दिनानिमित्त अभाविप च्या 500 फूट तिरंगा यात्रे ने चंद्रपूर करांचे वेधले लक्ष
चंद्रपूर, 15 अगस्त : जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर च्या वतीने स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव समाप्त वर्ष निमित्त चंद्रपूर येथे सर्व विद्यार्थी, युवक, नागरीक यांच्या मनामध्ये देशभक्ती चे वातावरण निर्माण करण्याकरीता "५०० फुट अखंड तिरंगा यात्रा" सकाळी ९:३० वाजता काढण्यात आले यावेळी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसहीत सामान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या तिरंगा यात्रेचा मार्ग सरदार पटेल महाविद्यालय - गंज वार्ड - वरसिद्धी शॉपिंग मॉल - रघुवंशी कॉम्लेक्स - जटपुरा गेट - कस्तुरबा रोड - गिरनार चौक - सराफा लाईन - गांधी चौक अशाप्रकारे होता, शहरातील विविध ठिकाणी व्यापारी बांधवांनी स्वागत केले, महाराष्ट्राचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तिरंगा यात्रा त्यांच्या निवासाजवळ पोहचताच पुष्पवर्षाव करीत स्वागत केले. गांधी चौक येथे ढोल ताशा पथकाने शेकडो नागरिकांना आकर्षित केले, अतिशय शिसतबद्ध पध्दतीने तिरंगा यात्रा पार पडली हे विशेष.तिरंगा यात्रेचा समारोप शहरातील गांधी चौक येथील महानगर पालिका पार्कींग येथे जाहीर सभेने झाला याप्रसंगी प्रांत मंत्री शक्ती केराम, प्राध्यापक डॉ. पंकज काकडे यांनी विद्यार्थ्याना संबोधित केले. तिरंगा यात्रेमध्ये विशेष आकर्षण म्हणून शहीद स्मारक रथ, ढोल ताशा पथक वेशभूषा आदींचा समावेश होता.
शक्ती केराम यांनी देशाला स्वतंत्र कस मिळाले याचे महत्व विद्यार्थ्यां समोर मांडताना 75 वर्षात भारताने मिळवलेल्या उपलब्धी युवकांसमोर मांडल्या भारत हा कसा विश्वगुरु कडें वाटचाल करतोय यावर प्रकाश टाकत आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण हें जीवनासाठी जीवन हें देशासाठी या भावनेने शिक्षण घ्यावे मत व्यक्त केले.
ABVP's 500 feet Tricolor Yatra on Independence Day caught the attention of Chandrapur Kars.