चंद्रपुर प्रशासकीय भवनाच्या इमारतीला आग, महानगर पालिका व औष्णिक विद्युत केंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी Fire at the building of Chandrapur administrative building, fire brigade of Mahanagara Palika and thermal power station on the spot

चंद्रपुर प्रशासकीय भवनाच्या इमारतीला आग,

महानगर पालिका व औष्णिक विद्युत केंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी 

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 06 ऑगस्ट: चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या, बस स्थानकाच्या समोर असलेल्या प्रशासकीय भवनात आग लागल्याची घटना रविवार, ६ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तात्काळ चंद्रपूर मनपा तसेच महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
दोन्ही विभागांचे मिळून ७- ८ अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले आहेत. ही आग तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला लागली असून या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेले अवैध तंबाखू, अंमली पदार्थ व इतर प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर असून यातील बरेच साहित्य व कागदपत्रे आगीत स्वाहा झाले असण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय भवन या इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. ज्याठिकाणी दररोज शेकडो लोक शासकीय कामाकरीता येत असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा माहिती अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख ही महत्त्वाची कार्यालये याच इमारतीत असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीच्या अगदी शेजारीच जिल्हा न्यायालय, दुसऱ्या बाजूला रामनगर पोलीस ठाणे, मागील बाजूला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने हा परिसर महत्त्वाचा व संवेदनशील समजल्या जातो. पहाटे फिरण्यास निघालेल्या नागरिकांना प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहानिशा केली असता तिथे आग लागल्याचे निष्पन्न झाले. काही जागरूक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवली. कार्यालयातील फाईल्स, फर्निचर आगीत जळाले आहे. लगतच जिल्हा अधीक्षक कार्यालय असून त्यालाही आगीची झळ पोहचली. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख व सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी जीवाची पर्वा न करता महत्त्वपूर्ण अभिलेख कार्यालयातून बाहेर काढणेकामी युद्ध पातळीवर काम केले आणि अभिलेख सुरक्षित ठिकाणी ठेवला. आगीची तीव्रता व इमारतीचे महत्त्व लक्षात घेता मनपा व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण व वेळ मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Fire at the building of Chandrapur administrative building, fire brigade of Mahanagara Palika and thermal power station on the spot

#Fire-at-the-building-of-Chandrapur-administrative-building     #fire-brigade #Mahanagara-Palika  #Thermal-power-station #Fire #Chandrapur  #Aag