▪️तरुण हा दाताळा (नवीन चंद्रपुर) येथील रहवासी
#Loktantrakiawaaz
गडचांदूर, 15 अगस्त: कोरपना तालुक्यातील गडचांदूर पासून थोड्याच अंतरावर असलेल्या अंमलनाला डॅमच्या वेस्ट वेअर वरून वाहणाऱ्या पाण्यात बुडून एक तरुण मृत्यू पावला पाऊस कमी पडल्याने सध्या वेस्ट वेअर वरून पाणी वाहत नसतानाही सुट्टीच्या दिवशी पर्यटक येथे येत आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी याठिकाणी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुभम शंकरराव चिंचोलकर' वय वर्ष 32, रा. दाताळा (नवीन चंद्रपुर) चंद्रपूर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मित्रासोबत अमलनाला डॅम येथे फिरण्यास आला होता.
आज दुपारी अंदाजे 2 वाजताच्या सुमारास पोहता येत नसताना सुद्धा त्याने डॅमचे वेस्ट वेअर येथील खोल पाण्यात उडी मारल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.
▪️One person drowned in Gadchandur Amlanala Dam
▪️Young Man is a resident of Datala (New Chandrapur)
#Datala #New-Chandrapur #Amlanala-Dam #Gadchandur #Chandrapur