🏍️ काय आहे 'AI’ आधारित वाहन चाचणी❓
मुंबई : (RTO) Vehicle वाहनचालकाला लायसन्स द्यायचे की नाही, याबाबत आता एआय (Artificial Intelligence) अहवाल देणार आहे. सध्या चालकाला लायसन्सच्या चाचणीसाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आता हे काम अवघ्या १० सेकंदात होणार. महाराष्ट्र राज्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवणे आणि रस्ते सुरक्षा वाढीसाठी राज्य सरकारने मानवी हस्तक्षेप कमी करून कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील १७ ‘आरटीओ’मध्ये कृत्रिम प्रज्ञा वापरून वाहन चाचणी पथ उभारण्यात येणार आहेत. या पथावर चाचणीअंती अवघ्या दहा सेकंदांत निकाल येणार असून, त्यानुसार वाहनचालक ‘लायसन्स’साठी पात्र आहे की नाही, हे ठरवण्यात येणार आहे.
🏍️ होणार दहा सेकंदांत निर्णय
दुचाकी, चारचाकी, हलकी वाहने आणि अवजड वाहनांसाठी वाहन चाचणी पथ उभारण्यात येणार आहे. पथावर कृत्रिम प्रज्ञा वापरून चाचणीअंती अवघ्या दहा सेकंदांत चाचणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. यानुसार संबंधित चालकाला लायसन्स द्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या चालकाला लायसन्सच्या चाचणीसाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो.
चाचणी पथांचे प्रकार
- इंग्रजी आठ आकाराचा
- एच आकाराचा
- ५ पॉइंट
- ग्रेडियंट (चढ-उतार)
- ओव्हरटेकिंग, ट्रॅफिक सिग्नल
🏍️ चाचणीच्या चित्रीकरणानंतर...
- प्रत्यक्ष वेळेमध्ये वाहन चालवण्याच्या कौशल्याची माहिती जमा करता येते
- मानवी हस्तक्षेपाशिवाय वैज्ञानिक मूल्यांकन
- निष्पक्ष आणि पारदर्शक चाचणी यंत्रणा
- डेटाबेस निर्मिती आणि तक्रार निवारण कक्ष
- चाचणी परिणामांचे विश्लेषण आणि चाचण्यांचे परिणाम फलकांवर प्रदर्शित केले जातील
- सर्व अर्जदारांसाठी प्रतीक्षागृह असेल
🏍️ महाराष्ट्र राज्यात १७ ठिकाणी ‘एआय’आधारित वाहन चाचणी पथ उभारण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. रस्ते सुरक्षेसाठी वाहन चाचणी पथ महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
Now "AI" will decide whether to give driving license or not, what is 'AI' based vehicle test❓
#AI #drivinglicense #vehicletest
#ArtificialIntelligence #RTO