चंद्रपूर ८ नोव्हेंबर - चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत परवानगी न घेता अनधिकृत बॅनर होर्डींग, स्टिकर्स लावणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई केली जाणार असुन संबंधितांनी याची नोंद घेऊन रीतसर परवानगी घेऊनच बॅनर अथवा होर्डींग लावण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते. मात्र अनेकदा टॅक्स न भरता व परवानगीही न घेता बॅनर इत्यादी लावण्यात येतात.
अश्या अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सची मुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होते.अश्या व्यक्तीवर आता कारवाई केली जाणार असुन प्रसंगी शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हासुद्धा दाखल केल्या जाणार आहे.
Action will be taken on unauthorized banner hoarding
#Actionwillbetakenonunauthorizedbannerhoarding #cmc #chandrapurcmc #chandrapur