दोन दिवसात निर्णय घेण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्यअभियंता वीजवितरण कंपनी मर्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूप बंद आंदोलन करू
आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सरकारला अल्टिमेटम
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार दिनांक 3.11.2023 रोजी सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून कुलूप ठोकले. त्यानंतर ठिय्या आंदोलन करून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात हुकूमशाही सरकारच्या निषेध केला. यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी नरमले असून हि मागणी दोन दिवसात पूर्ण करणार असे आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्य अभियंता वीजवितरण कंपनी मर्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूप बंद आंदोलन करू असा अल्टिमेटम आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिला अध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमुरकर, प्रमोद मगरे, बसंत सिंग, निलेश भालेराव, मनोहर स्वामी, फिरोज पठाण, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे, रवींद्र धोपटे, संजय घागी, गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे, सविता सुपी, योगेश खामणकर, अनिल झोटिंग, किशोर डुकरे, मयूर विरुटकर, अनिरुद्ध देठे, विलास गावंडे, सुधाकर कडुकर, किशोर डुकरे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, संदीप कुमरे, रितेश वाढई, तन्वीर शेख, महेश कोथडे, निखिल राऊत, गुरु थई, सचिन पचारे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्हा हा ऊर्जानिमिर्ती करणारा जिल्हा आहे. खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० मे. वॅ. वीजनिर्मिती होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. २ दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने आज हे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.
महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून पुढे देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.
MLA Pratibha Dhanorkar locked the electricity distribution office
#MLAPratibhataiDhanorkarlockedThe ElectricityDistributionOffice #PratibhaDhanorkar