नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर,दि.05 दिसंबर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्ह्या त बहुदा सर्वत्र हल्काा ते मध्यंम पाऊस पडण्याीची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्याु कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (30 ते 40 किमी प्रतितास) होण्यासची शक्यिता वर्तविली आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी घ्यावी काळजी :
संरक्षणात्मपक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्यात. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्याा आणि दरवाज्या पासून दुर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातुन जाणे टाळावे. खराब दृश्यरमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्यावचा प्रयत्नह करू नका. पाणी दिसते त्याटपेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्याूत मोडतोड तीक्ष्णा किंवा धोकादायक वस्तूत, भांडे, छिद्र किंवा विजेच्या तारा असु शकतात. पॉवर लाईन्सी किंवा विजेच्याी तारांपासून दुर रहा. फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्या तारांपासून दुर रहा.
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये:
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास त्या वस्तू त्वरीत बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. तरी, जिल्ह्या तील नागरिकांनी उचित काळजी घ्याेवी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यातत आले आहे.
Yellow alert issued for Chandrapur district on December 6, district administration appeals to citizens to be vigilant