चंद्रपूर १९ जानेवारी - चंद्रपुर शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या भंडारा व्यसनमुक्ती केंद्रा विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपुर शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंद्रपुर शहरातील गांधी चौक, मिलन चौक, जयंत टॉकीज, शहरातील मुख्य रस्ते, रस्त्यांवरील झाडे तसेच विविध शासकीय व खाजगी परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची जाहिरात करणारे स्टीकर्स, भिंतीपत्रके चंद्रपुर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे यांना १७ जानेवारो रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.
संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने भंडारा व्यसनमुक्ती केंद्र यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते .
भिंतीपत्रके, पोस्टर्स, बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

Police Complaint of Chandrapur Municipal against Bhandara Addiction Center
#PoliceComplaint #Chandrapur #Municipal #cmc #Chandrapurcmc #cmcchandrapur #BhandaraAddictionCenter