⭕ 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरीच मतदान करता येणार
⭕ देशात २ लाखाहून अधिक मतदार १०० वर्षाचे
⭕ देशात १.८२ कोटी नवीन मतदार
नवी दिल्ली, 16 मार्च : लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा शंखनाद झाला असून मतदार देखील निवडणुकीसाठी उत्साही दिसत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणूक एका उत्सवाप्रमाणे आहे. असे मुख्य निवडणूक अधिकार राजीव कुमार यांनी म्हटले आहे. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
▪️देशात १.८२ कोटी नवीन मतदार
देशात २ लाखाहून अधिक मतदार १०० वर्षाचे आहेत. देशात १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
देशात ४७ कोटी महिला तर ४९ कोटी पुरुष मतदार आहेत. २ वेळा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार. पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही.
सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. खोट्या बातम्यांबाबत सत्यतेची माहिती आम्ही देणार आहोत. कोणतीही माहिती हवी असेल तर वेबसाईटवर मिळणार आहे.
निवडणुकीत विमान आणि हेलिकॉप्टरने येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.
Voters above 85 years of age can vote at home, more than 2 lakh voters in the country are 100 years old, 1.82 crore new voters in the country
#Loksabha #Loksabha-Election #Matdan #Election #Chunav #vote #Voter #New-Voter