मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल, बस्स.... मतदान करून सेल्फी अपलोड करा, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकर्षक बक्षीस जिंका स्पर्धा Voters! You can also win bikes, racing cycles and Android mobiles, buses... Vote and upload selfies, win attractive prizes on behalf of District Administration Contest


मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

बस्स.... मतदान करून सेल्फी अपलोड करा

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकर्षक बक्षीस जिंका स्पर्धा

चंद्रपूर, दि. 15 अप्रैल : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे.  13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर मतदारांनो, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. बस्स.... 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करा आणि जिंका बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड फोन.

19 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/  तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पहिल्या तीन क्रमांकाचे आकर्षक बक्षीसे : प्रथम बक्षीस 1 लक्ष 60 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची आरटीआर – 140, 4 व्ही बाईक, (आरटीओ आणि विमा खर्च समाविष्ट). सद्यस्थितीत विसापूर येथील श्रध्देय श्री. अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये ही बाइक प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षीसांमध्ये 91 मिराकी ई-सायकल ( किंमत 35 हजार) आणि सॅमसंग ॲन्ड्राईड फोन (किंमत 20 हजार )

पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक आहे. 2) 19 एप्रिल 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक आहे. 

अटी व शर्ती : 1) इच्छुकांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या गुगल फॉर्मवर अपलोड करावा. येथे दिलेला क्यूआर कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो. 2) सेल्फी हा स्पष्ट आणि फिल्टर न केलेला कलर फोटो असावा. 3) सेल्फीमध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तिचा चेहरा, त्याचे/तिचे बोट अमिट शाईने (मतदान केल्यानंतर चिन्हांकित) दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करा. 4) सेल्फी 20 एप्रिल 11.59 पीएम पूर्वी अपलोड करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. 5) 20 एप्रिल रोजी एक संगणकावर आधारित अल्गोरिदमिक लकी ड्रॉ काढण्यात येईल, जेणेकरून विजेते आणि चार प्रतीक्षा यादीतील उमेदवार घोषित केले जातील. 6) निवडून आलेल्या विजेत्याला त्याचे फोटो ओळखपत्र, व्होटर स्लिप आणि पॅन कार्ड सादर करण्यासाठी 23 एप्रिल, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. 7) असे करण्यात अयशस्वी झाल्यास प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल.

हे सहभागी ठरू शकतात अपात्र : 1) सेल्फीमध्ये चेहरा अस्पष्ट आहे किंवा बोटावर शाई आहे किंवा मतदान केंद्र दिसत नाही. 2) आवश्यक कागदपत्रे तीन दिवसांत सादर करण्यात अयशस्वी. 3) गुगल फॉर्ममध्ये सर्व तपशील भरलेले नाहीत. 4) चंद्रपूर मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत केलेली नाही. 5) कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत किंवा कायदेशीर गैरव्यवहारात भाग घेतल्याचे आढळण्यात आले.  

तर मतदारांनो, या स्पर्धेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळकट करा आणि बक्षीसे जिंका, असे आवाहन जिल्हा निवडणूक आधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Voters!  You can also win bikes, racing cycles and Android mobiles, buses... Vote and upload selfies, win attractive prizes on behalf of District Administration Contest

#Voter-Selfy #Chandrapur