चंद्रपुर: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावातील अतिक्रमण काढुन या एकमात्र तलावाचे संरक्षण करण्यासाठी रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटना जिल्हा प्रशसनाचा सतत पाठपुरावा करित आहे। संघटने च्या प्रतिनिधी मंडलाने दि 28 मे रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मंगेश खवले यांची भेट घेऊन रामाला तलावातील अतिक्रमणा बाबत चर्चा करुन निवेदन दिले। उपायुक्त महोदयांनी लगेच संबंधित अधिकारीला तलावातील अतिक्रमणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिले।
प्रतिनिधी मंडलाने चर्चा करतांना उपायुक्त महोदयांना सांगीतले कि, मद्रास उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार जलस्त्रोतांवर कुणीही अतिक्रमण करुच शकत नाही। जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याची जवाबदारी स्थानिय प्रशासनाची आहे। जर कुणी अतिक्रमण केले असेल तर ते काढण्याची जवाबदारी स्थानिय प्रशासनाची आहे। या संदर्भाचे निर्देश भारत सरकार च्या जल संसाधन मंत्रालयाच्या स्ट्यांडिंग कमेटी चे ही आहेत। या निर्णयानुसार महानगरपालिकेने रामाला तलावाच्या संदर्भात कार्यवाहि करावी ही विनंती आहे।
चंद्रपूर शहरातील पांच तलाव अतिक्रमणग्रस्त होऊन नष्ट झालेले आहेत। रामाला तलाव देखिल अतिक्रमणाच्या तावडीत सापडून अर्धा नष्ट झालेला आहे। या तलावाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने कडक कार्यवाहि करणे आवश्यक आहे। कारण या तलावाने शहरातील भूजल पातली समाधानकारक ठेवली आहे। जर हा तलाव ही नष्ट झाला तर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष झाल्या शिवाय राहणार नाही।
उपायुक्त महोदयांनी सकारात्मक चर्चा करुन रामाला तलावाच्या संदर्भात योग्य ती कार्यवाहि करण्याचे आश्वासन दिले।
रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटना या संदर्भात सतत पाठ पुरावा करित आहे। जानेवारी महिन्यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त महोदयांना निवेदन देऊन चर्चा केली। फेब्रुवारीत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन चर्चा केली। या संदर्भात प्रशासनाला सतत विचारणा करित आहे। मे महिन्याच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा केली आणि 28 मे रोजी पुन्हा भेट घेऊन काय कार्यवाही केली याची विचरणा करुन निवेदन दिले।
रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या प्रतिनिधी मंडलाचे मनोज जुनोनकर, प्रा डा जुगलकिशोर सोमाणी, मुरलीमनोहर व्यास,दिनेश बजाज, चुडामण पिपरिकर,सुधीर बजाज आदिंनी चर्चा केली।
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावाचे संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी संघटनेला सहकार्य करावे। जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त ला रामाला तलावाच्या संरक्षणा साठी निवेदने पाठवावी। असे आवाहन संयोजकांनी केले आहे।