व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक, १३ जणांचे भाग्य मतपेटीत बंद, उद्या लागणार निकाल ९३ टक्के झाले मतदान Voice of Media election, 13 people's fate locked in the ballot box, the result will be announced tomorrow.. 93 percent voting

व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक

१३ जणांचे भाग्य मतपेटीत बंद

उद्या लागणार निकाल.. ९३ टक्के झाले मतदान

मुंबई : व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य पदाधिकाऱ्यासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तालुक्यापासून राज्यापर्यंत असणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये 93 टक्के मतदान झाले. उद्या या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया ही एक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय संघटना आहे. लोकशाही पद्धतीने पत्रकाराचे प्रश्न सोडवित, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरात पत्रकारांची नंबर एकची संघटना म्हणून गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. अल्पावधीतच या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे. या संघटनेत काम करणारे पदाधिकारी सुद्धा लोकशाही मार्गाने निवडून आले पाहिजेत.  त्यांनी योग्य प्रकारे काम केले पाहिजे या उद्देशाने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून संजीवकुमार कलकोरी व सुरेश शेळके यांच्या निर्देशानुसार आज रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत मतदान झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यातून मोठयाप्रमाणात पत्रकारांचा प्रतिसाद मिळाला मोठयाप्रमाणात मतदान झाले.

लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन पदाधिकारी निवडणारी ही पत्रकारांची संघटना आहे. एकूण ९३% मतदान झाले असून १३ जणांचे भाग्य  मतपेटीत बंद झाले आहे. ॲड.संजीवकुमार कलकोरी व सी.ए.सुरेश शेळके हे आज दि. २३ रोजी दुपारनंतर  निकाल घोषीत करतील. निवडणुकीला घेवून  पत्रकाराची उत्सुकता वाढली असून आपला उमेदवार निवडून येईल अशी भावना निर्माण झाली आहे. कोण होणार प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, याबाबत सर्वाना उत्सुकता लागली आहे.

आज झालेल्या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात अनिल मस्के ,योगेंद्र दोरकर ,अजित कुंकूलोळ,विजय चोरडिया ,दिगंबर महाले, मंगेश खाटीक ,संजय पडोळे, अरुण ठोंबरे ,अमर चौदे ,किशोर कारंजेकर, मिलिंद टोके ,सतीश रेंगे पाटील व सचिन मोहिते यांचा सहभाग होता.

Voice of Media election, 13 people's fate locked in the ballot box, the result will be announced tomorrow.. 93 percent voting

#Voice-of-Media  #election #VOM #Media