चंद्रपूर १० ऑक्टोबर - केंद्र सरकार पुरस्कृत पी -एम बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहराला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असुन या बसेससाठी चार्जिंग स्टेशन व वाहनतळ कृषी भवनच्या जवळील जागेत उभे राहणार आहे. या वाहनतळाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माननीय नामदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे
शहरातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये 'पीएम ई- बस सेवा' या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती.
या उपक्रमाचा उद्देश केवळ शहरातील लोकांना सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करून देणे नाही तर पर्यावरण प्रदूषण कमी करणे देखील आहे. ई-बस'साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाणार आहे. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला होता.
या भूमिपूजन सोहळ्यास मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार,मा.खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर,मा.आमदार श्री.सुधाकर अडबाले, मा.आमदार किशोर जोरगेवार तसेच इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
ई-बस म्हणजे काय ?
ई-बस ही एक शून्य उत्सर्जन बस आहे. ती साधारणतः कोणताही आवाज करत नाही. ते इंधनाऐवजी विजेवर चालते. अशा बसेस ऑनबोर्ड बॅटरी पॅक किंवा बाह्य स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करतात. जलद चार्जरवर ई-बस एक ते दीड तासात चार्ज करता येते. ते एका चार्जमध्ये किमान १२० किमी धावू शकते. डीटीसी फ्लीटमधील ई-बस शून्य टेलपाइप उत्सर्जनासह ते इंधनावर आधारित वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करते, अशा ई-बसेस प्रदूषणावर मात करण्यास प्रभावी ठरतात.
ई-बसमध्ये काय विशेष आहे?
ई-बसेसच्या किमतीनुसार त्यात विविध सुविधा असतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बसमध्ये १० पॅनिक बटणे आणि एक टूटर असतो. शिवाय, दिव्यांग प्रवाशांसाठी गुडघे टेकण्याचा स्म्प व महिला प्रवाशांसाठी खास आसनांची व्यवस्था असते.
ई-बस' कुठून कुठपर्यंत ?
चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भदावती, घुग्गुस. आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील.
#Chandrapu-Bhoomipujan- Ceremony
#Electric-Bus-
#Chargingstation
#cmc
#चंद्रपुर