टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु condition of Ratan Tata, head of the Tata Group of Industries,  Treatment started at a Mumbai hospital

टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, 

मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई, 09 ऑक्टोबर : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ७ ऑक्टोबरला पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते लवकर बरे व्हावेत म्हणून देशभरातून लोकं प्रार्थना करत आहेत.

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. अशी माहिती रॉयटर्सने बुधवारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर त्यांच्याकडून असे कळवण्यात आले होते की, काळजीचे कोणतेही कारण नाही. वय-संबंधित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणलं गेलं आहे. टाटा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या आरोग्याबाबत पसरलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत.”
रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटा यांना सोमवारी पहाटे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले होते. रतन टाटा यांनी मार्च 1991 टाटा सन्सची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर 28 डिसेंबर 2012 रोजी ते निवृत्त झाले. त्यांनी टाटा समुहाच्या उत्पन्नात अनेक पटींनी वाढ करुन दाखवली.

condition of Ratan Tata, head of the Tata Group of Industries,  Treatment started at a Mumbai hospital

#Ratan-Tata
#Tata-Group-of-Industries
#Mumbai-hospital
#Tata