एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी? Eknath Shinde's first list of Shiv Sena candidates announced   Anyone have a chance?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर,

 कुणाकुणाला संधी?

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  महायुतीने यासह उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्याच चुकीतून सावरुन महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेत उमेदवारही निश्चित केले आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अखेर शिवसेनेकडे उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.

Eknath Shinde's first list of Shiv Sena candidates announced

Anyone have a chance?

#EknathShinde
#ShivSena 
#MaharashtraAssemblyElection 
#Maharashtra