राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू NCP leader Baba Siddiqui killed in firing

Big Breaking News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

मुंबई: बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.Big Breaking News: NCP leader Baba Siddiqui killed in firing

#Baba-Siddique-firing
#Baba-Siddiqui