कोण किती जागा लढणार?
वाचा संपूर्ण माहिती
मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. बैठकीच्या अनेक फेऱ्या उलटल्यानंतर महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिन्ही पक्षांची एकत्र पत्रकार परिषद होणार असून जागा वाटप जाहीर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 105 जागा लढणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला 95 जागा मिळणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 84 जागा व 4 जागा मित्र पक्षला मिळणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये विदर्भातल्या जागांवरून वाद झाला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद टोकाला गेला होता. नाना पटोले महाविकास आघाडीच्या बैठकीला असतील तर आपण बैठकीला जाणार नसल्याचा पवित्र ठाकरे गटाकडून घेतला गेल्याचं बोललं गेलं. यानंतर काँग्रेसचे सगळे नेते दिल्लीमध्ये गेले होते.
काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत बोलण्याची जबाबदारी दिली होती. यानंतर काल बाळासाहेब थोरात आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम तोडगा निघाला आहे.
The seat allocation formula of Mahavikas Aghadi was finally decided.
Who will fight for how many seats?
Read complete information
#MahavikasAghadi
#MVA
#MaharashtraElection2024
#MaharashtraAssemblyElection2024
#Congress
#UBT
#NCPSharadPअwar