ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला 'दिला शब्द तीन दिवसांत केला पूर्ण' Sudhir Mungantiwar told the tribal community that 'Dila Shabd was completed in three days'.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला 'दिला शब्द तीन दिवसांत केला पूर्ण'

पोंभुर्णा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव

पोंभुर्णा येथे महामहीम राज्यपालांच्या उपस्थितीत केली होती घोषणा

पोंभुर्णा, दि.५ ऑक्टोबर - ‘शब्द दिला की तो
पाळलाच पाहिजे’ या तत्वाचे पालन करणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची प्रचिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वी आदिवासी समाजाच्या मेळाव्यात महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दिलेला शब्द ना. श्री. मुनगंटीवार यांनी अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केला आहे. सांस्कृतिक मंत्री ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारमुळे आता पोंभुर्णा येथील आदिवासी समाजासाठी समर्पित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिलांसाठी समर्पित चंद्रपूरमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वीरांगना राणी दुर्गावती यांचे नाव आणि आदिवासी समाजासाठी समर्पित पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन्ही मागण्या अतिशय तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले.

पोंभूर्णा येथे १ ऑक्टोबरला आदिवासी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधवांशी संवाद साधताना ना मुनगंटीवार यांनी शब्द दिला. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे, आदिवासी समाजासह संपूर्ण देशाच्या कल्याणाचा विचार करणारे भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव पोंभुर्णाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येईल’, असा शब्द ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

त्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला पत्र दिले. पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत. यासंदर्भात संबंधित विभागाशी, मंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. तीन दिवसांत शासन निर्णय निघाला. ४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या यादीत पोंभुर्णाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्यासंदर्भात उल्लेख आहे. या निर्णयामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे. ‘भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या कर्तृत्वाचा केवळ आदिवासी समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्यामुळे अतिशय आनंद देणारा हा निर्णय आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Sudhir Mungantiwar told the tribal community that 'Dila Shabd was completed in three days'.

#Sudhir-Mungantiwar 
#Dila-Shabd-was-completed 
#Chandrapur