सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा पदाधिकारी, बूथप्रमुख, पेजप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांना आवाहन
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपुर, 15 नवंबर: माझा बूथप्रमुख असो, पेजप्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, पक्षाचा पदाधिकारी असो वा सामान्य कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती पक्षाचा आत्मा आहे. आपण आजवर केलेला विकास व लोक कल्याणाची कामे हीच आपली शक्ती आहे. ही शक्ती घेऊनच आपल्याला जनतेसमोर जायचे आहे. विरोधकांचे फेक नरेटिव्ह हाणून पाडा. महायुती सरकारच्या लोक हिताच्या योजना जनतेपर्यंत पोचवा व विजयश्री खेचून आणा, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख, पेज प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद सेतूच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लोकसभेत खोटं बोलत त्यांनी नरेटीव्ह सेट केला, कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीत जाती-पातीचा आधार घेतला, संविधान बदलणार आहे असं खोटं रेटुन बोललेत मात्र त्यांनीच आज मध्यवर्ती बॅंकेच्या नोकर भरती मध्ये आता आरक्षण ठेवले नाही, हा कॉंग्रेसचा खरा चेहरा आहे, तो आपल्याला जनतेसमोर आणायचा आहे.आपसामध्ये प्रेमभाव ठेवत, अथक परिश्रम घेत, सुक्ष्म नियोजनाच्या माध्यमातुन मतदार बंधू-भगिनींना मतदान केंद्रावर नेण्याची आपली जबाबदारी आहे, यासाठी आपल्याला गावातील बुथचे राजकीय विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटकांशी योग्य समनव्य राखण्याची आवश्यकता आहे, अडीच वर्ष काँग्रेसचा पालकमंत्री होता, पाच वर्षे काँग्रेसचा खासदार होता त्यांनी काय केले याचा जाब काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अनेक काँग्रेसी माळी समाजासाठी तुम्ही काय केले म्हणून विचारणा करतात. खरतर आपण महात्मा ज्योतीबा फुलेंच्या वंशजांना न्याय दिला, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला देण्यामध्ये माझा पुढाकार होता. पुण्यातील भिडे वाडयाचा काम व्हावे, भिडेवाड्यात स्मारक व्हावे यासाठी मी विधानसभेत चर्चा उपस्थित केली. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्याचे नूतनीकरणाचे काम मी सुरू केले. हे सर्व काम जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आपण बारा हजारावरून पंधरा हजाराची मदत करणार आहोत, लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रु देणार आहोत ही माहिती जनतेला सांगा.बूथचे सूक्ष्म नियोजन करणे, स्लिप मतदारांपर्यंत पोचवणे, जाहीरनामा, प्रसिद्धी पत्रके मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम गतीने करावे असे आवाहन करत विजयासाठी सर्वशक्तीनिशी परिश्रम घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.

Reveal the true face of Congress to the people
Sudhir Mungantiwar's appeal to BJP functionaries, booth heads, page heads, Shakti Kendra heads
#RevealthetruefaceofCongresstothepeople
#Reveal the
#truefaceofCongress
#Congress
#Sudhir Mungantiwar
#BJP
#boothheads
#pageheads
#ShaktiKendraheads