ना. सुधीर मुनगंटीवार यांना मच्छीमार समाजाचा विनाशर्त पाठिंबा, ना. मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प Sudhir Mungantiwar's unwavering support from fishermen community, Resolve to elect Mungantiwar with a huge majority

ना. सुधीर मुनगंटीवार यांना मच्छीमार समाजाचा विनाशर्त पाठिंबा

ना. मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प


मुल: मुल येथील सर्व मच्छिमार संस्था व समाजातील सर्व संघटनांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना एकमताने विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

मुल येथील भाग्यरेखा मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मच्छिमार संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ना. श्री. मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मासेमारी समाजाच्या विकासाकरिता भूजल विकास महामंडळ स्थापन केले, अतिवृष्टीमुळे मासेमारी संस्थांना नुकसान भरपाई देण्यात आली, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तलावांमधून मत्स्यबीज मासे वाहून गेलेल्या जिल्ह्यातील तलावांना कुठलेही शुल्क न आकारता एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय,शासनाकडून बोटुकली (मत्स्यबीज) खरेदीसाठी आर्थिक मदत,मच्छिमार संस्थेच्या विकासाकरिता अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामुळे मुल, बल्लारपूर व पोंभुर्णा येथे मासेमारी समाजाने पाठिंबा जाहीर करून ना. श्री. मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प केला आहे, असे समाजबांधवांनी सांगितले.

भोई समाजाचे नेते अॅड. अमोल बावणे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष बंडू हजारे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले,भाजपचे जिल्हा सचिव अमित चवले,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटावार, प्रभाकर भोयर, अतुल झाजरी, जितू टिंगूसले, कवडू कोल्हे तसेच विधानसभा क्षेत्रातील सर्व मासेमारी संस्थांचे संचालक व समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar's unwavering support from fishermen community, Resolve to elect Mungantiwar with a huge majority

#SudhirMungantiwar 
#Mungantiwar 
#supportFromfishermencommunity 
#Ballarpur 
#Mul 
#Maharashtra