केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला
आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडणार
मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव अगदी वेळेवर काढलं
#Loktantra Ki Awaaz
नागपुर: भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी मागील सरकारच्या काळात मंत्री असताना चांगल काम केलं असं नागरिकांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मंत्री पद नमिळाल्याने सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहे का? अशा प्रकारचा प्रश्न राज्यात विचारला जाऊ लागला आहे. तसेच नागपुरात उपस्थित असून देखील सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याने अनेक चर्चेला उधाण आले असताना स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी यावर खुलासा केला आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत माझे नाव होते, पण कालच्या यादीत वगळण्यात आल्याचा मोठा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मनातील खंत यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळात माझं नाव आहे असे अगोदर मला सांगण्यात आले होते, परंतु काल माझे नाव नव्हते. काल सकाळपर्यंत नाव होते पण अन् वेळेवर ते नाव कमी करण्यात आले ते मला माहिती नाही. भाजप प्रदेशा कडून मंत्री मंडळाच्या यादीत माझं नाव पाठवलं असं मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी सांगितलं होतं. माझं नाव कटणार याची मला माहिती नव्हती.
पार्टी अशा प्रकारे राग काढते का कधी?: सुधीर मुनगंटीवारांचे ते खंदे समर्थक असलेले पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते. यासाठी ते दिल्लीला पण गेले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले होते. तीच घडामोड आपल्या विरोधात गेली का याविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पार्टी अशा प्रकारे राग काढते का कधी? मला सांगा ज्यांच्या कुंटुंबातील मुलगा दुसऱ्यांच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी दिल्लीला गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचीत विचार करत नाही.
नितीन गडकरी माझे मार्गदर्शक: मुनगंटीवार: पक्ष संकुचीत नाही मी एखाद्या उमेदवारासाठी तिकीट मागितली या कारणांनी मंत्रिपद नाकारणार नाही. बाहेरच्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा पक्ष कार्यकर्त्याला उमेदवारी द्या एवढीच माझी मागणी होती. माझी गडकरी सोबत जी चर्चा झाली ती बाहेर सांगणार नाही गडकरी माझे मार्गदर्शक आहे मी अनेकदा येतो सहज चर्चा झाली. ही छोट्या भावाची मोठ्या झालेली चर्चा आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रिपद काढलं मला माहिती नाही, मुनगंटीवार जेव्हा मी प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस माझे महामंत्री होते. तसेच माझा महाराष्ट्रात परिचय आहे त्यामुळे मला मंत्री पद मिळाले नाही यामुळे लोक आपला राग व्यक्त करत आहे. माझं नाव का कापण्यात आलं याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देऊ शकतात. मला थंडी मानवत नाही त्यामुळे मी दिल्लीला जात नाही. कुठल्या कारणाने माझा मंत्रिपद काढलं ते मला माहिती नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लाडक्या बहिणींनी एवढे जास्त संख्येत आमदार निवडून आणले. 196 आमदारांपैकी मी आहे पक्षाने मला कुठली जबाबदारी दिली तर मी ती स्वीकारेल मी आमदार आहे त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे. मंत्री असतो तर जास्त वेगाने काम केलं असतं आमदार आहे तर कमी वेगाने काम होईल.
MLA Sudhir Mungantiwar: I am not upset, Mungantiwar interacted with media after meeting Union Minister Nitin Gadkari
#MLASudhirMungantiwar
#Iamnotupset
#MungantiwarInteractedwithmedia #UnionMinisterNitinGadkari
#SudhirMungantiwar