'झेडपी ' पदभरतीत समांतर आरक्षणातून पात्र होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा Awaiting appointment in 'ZP' post despite qualifying through parallel reservation

'झेडपी ' पदभरतीत समांतर आरक्षणातून पात्र होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा

चंद्रपूर - चंद्रपुर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. लेखी परीक्षा, दस्तावेज पडताळणी असे सर्व अडथळे पार करून निवड यादी जाहीर झाली. आता तरी आपल्याला नियुक्ती आदेश मिळेल आणि आपण कामाला लागू अशी आशा निर्माण झाली होती. मात्र समांतर आरक्षणाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया आणखी दीड आठवडा लांबनीवर पडली आहे. पात्र उमेदवार जिल्हा परिषदेचे उंबरठे झीजवत आहेत.
           बेरोजगारीच्या काळात नोकरीसाठी जिवतोड संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करताना एखादा पडाव सर केला की, आता आपले ध्येय जवळ आले असे वाटू लागते. तशी उत्सुकताही वाढत जाते. मात्र ध्येय गाठण्यासाठी प्रतीक्षेचा कालावधी वाढत जातो. त्यामुळे संघर्ष करणाऱ्या मनावर मोठा आघात होतो, अशीच अवस्था जिल्हा परिषदेत सरळसेवा भरती मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची आहे. समांतर आरक्षणात रिक्त जागा भरण्याचा आदेश राज्य शासनाने 25 जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केला आहे.यातील सातव्या मुद्द्यात समांतर  आरक्षणाच्या रिक्त जागा भरण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतरही जिल्हा परिषदेने  या नियुक्त्या करण्यास दिरंगाई करत आहेत. ही प्रक्रिया रेंगाळत गेली. नियुक्ती देण्याची प्रक्रिया कधी पूर्ण होईल हे सांगितलं जात नाही, प्रत्येक वेळी उडवाउडविची उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे समांतर आरक्षणात पात्र ठरलेल्या उमेदवारांची परवड होत आहे. यासाठी आज चंद्रपूर जिल्हा परिषदे समोर मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले.या उलट गडचिरोली, बीड, नाशिक, अमरावती या जिल्हा परिषद प्रशासनाने समांतर आरक्षणात पात्र असणाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सेवेत सामावून घेतले आहे.इतर जिल्ह्यात होणारे निर्णय चंद्रपूर जिल्हा परिषदेला लागू नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Awaiting appointment in 'ZP' post despite qualifying through parallel reservation

#ZP 
#ChandrapurZillaParishad