ACB TRAP बल्लारपूर येथील तहसीलदार व तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ACB TRAP Anti-Corruption Bureau action against Tehsildar and Talathi of Ballarpur

ACB TRAP 
बल्लारपूर येथील तहसीलदार व तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बल्लारपूर : बल्लारपुर चे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड (वर्ग १) आणि कवडजई साजाचे तलाठी सचिन रघुनाथ पुकळे (वर्ग ३) यांच्याविरुद्ध लाचेच्या मागणीप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो, चंद्रपूर तर्फे कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार हे कोठारी, ता. बल्लारशाह येथील रहिवासी असून बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. त्यांची कवडजई येथे शेती असून, २३ मार्च २०२५ रोजी ते त्यांच्या शेतात माती/मुरूम काढून लेव्हलिंगचे काम करत होते. यावेळी तहसीलदार गायकवाड आणि तलाठी पुकळे यांनी त्यांना माती काढण्यास परवानगी नसल्याचे सांगत त्यांच्या दोन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी जप्त न करण्यासाठी तसेच कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली. तहसीलदार गायकवाड यांनी २ लाख रुपये आणि तलाठी पुकळे यांनी २० हजार रुपये लाच मागितली. त्याच दिवशी तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये देऊन उर्वरित १ लाख रुपयांची मागणी कायम ठेवली.

तक्रारदाराला होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी २६ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तहसीलदार गायकवाड यांच्या सांगण्यावरून तलाठी पुकळे यांनी तक्रारदाराकडे ९० हजार रुपयांची मागणी केली. यावरून आज, १ एप्रिल २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. मात्र, तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे बल्लारशाह पोलीस ठाण्यात आरोपी लोकसेवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलदार गायकवाड यांना ताब्यात घेतले असून, तलाठी पुकळे रजेवर असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे आणि सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पो. हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो. अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम आणि चापोशि सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संपर्क:
टोल फ्री नंबर: १०६४
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर: ०७१२-२५६१५२०
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर: ०७१७२-२५०२५१
पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले: ९३२२२५३३७२
पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले: ८८८८८५७१८४
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.acbmaharashtra.gov.in 

ACB TRAP 

Anti-Corruption Bureau action against Tehsildar and Talathi of Ballarpur 

#ACBTRAP 
#Anti-CorruptionBureauactionagainstTehsildarandTalathiofBallarpur 
#BallarpurTahasildar 
#ChandrapurACBTrapTahasildar